बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. विजयकुमार कांबळे यांची निवड

Admin
  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. विजयकुमार कांबळे यांची निवड 
सांगली - बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत एकमताने  डॉ. विजयकुमार कांबळे यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 
ही घोषणा व नियुक्ती राज्य अध्यक्ष  एस. आर भोसले यांनी केली. 
बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ ही संघटना शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी,शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी कार्य करते. 
2015 ते 2021  पर्यंत जिल्हाध्यक्ष, व  आज पर्यंत पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्ट कामकाज केल्याने  डॉ. विजयकुमार कांबळे यांची राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. 
विजयकुमार कांबळे यांनी सर्व अधिकारी,कर्मचारी,शिक्षक बांधवासाठी त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी शासन,अधिकारी दरबारी नेहमीच पाठपुरवा केला आहे.  कर्मचाऱ्यांसाठी  त्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. 
सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग  असतो. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
 डॉ. विजयकुमार कांबळे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सांगली येथे संघटनेच्या विशेष बैठकीत सेवानिवृत्त विभाग जिल्हाध्यक्ष  रघुनाथ सातपुते,  रमेश कांबळे व पदाधिकारी व डी. सी. पी एस संघटना यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी जिल्हाध्यक्ष  संजय सावंत,पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, कार्याध्यक्ष  राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष  सोपान भोसले, प्रा प्रकाश पाटील, नितेंद्र जाधव, बाळू गांगड, मा अशोक कांबळे, डी. सी. पी. एस संघटनेचे उपाध्यक्ष  लाखन मकानदार, इम्रान मुजावर,अमोल ठाकूर दीपक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top