भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये शाळेचे उपमुख्याध्यापक संभाजी माने हे 31मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या निमित्त संस्थेच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
तसेच शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, चांदीची गणेश मुर्ती, व पोशाख, पुष्पगुच्छ देवून मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रूपेश कर्पे , नंदकिशोर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांनी राजकारण, समाजकारण यात भाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. आयुष्यात प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल, गणितासारखा विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावण्याचे भाग्य लाभले याबद्दल संभाजी माने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेस अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार रुपये देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे,तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, संचालक धनपाल किणीकर, जयंत केळकर,व्यंकोजी जाधव, सचिव मानसिंग हाके, सहसचिव कृष्णा पाटील, माजी मुख्याध्यापक महावीर शेडबाळे, शुभांगी मन्वाचार, पर्यवेक्षिका राजकुमारी यादव, प्राचार्य दिपक देशपांडे, सुकुमार किणीकर, सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत पोतदार तर आभार मुख्याध्यापक संजय मोरे यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.