सांगली - धुळे जिल्हा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सांगली जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्य शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे. शनिवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.
दरम्यान धोडमिसे यांनी सांगली जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याचा अभ्यास करून विकासाचे आदर्श मॉडेल तयार करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्व समस्या जाणून, नवीन काय करावे लागेल याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करणार आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदासह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर आपला भर असणारा असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून सोळाव्या क्रमांकाने धोडमिसे 2019 मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. धोडमिसे या मूळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहेत, पण त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे.सीओईपी महाविद्यालया तून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे खाजगी कंपनीत काम केले आहे. नोकरी करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एमपीएससीच्या परीक्षेतून त्यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावर निवड झाली होती. या पदावर काम करताना त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी सुरू केली होती . यूपीएससी परीक्षा त्या 2019 मध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी 2021 ते 2023 या कालावधीत धुळे जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शुक्रवारी त्यांची सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते.संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.