विवेक वार्ता सातारा - कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सातारा जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कक्ष अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. एस घुले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश घुले ( सामान्य प्रशासन) यांच्या समवेत विविध प्रश्नां बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायगड जिल्ह्यातून नुकतेच रुजू झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) निलेश घुले साहेब यांचा राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, जिल्हाध्यक्ष संजय खरात, मारूती भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
या बैठकीत संघटनेच्या वतीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये बिंदू नामावली अद्यावत करणे, मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबत उपस्थित प्रश्नांवर चर्चा तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमधील रोस्टर डावलून देण्यात आलेल्या पदोन्नती व त्यामुळे मागासवर्गीय शिक्षक बांधवांवर होणारा अन्याय या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे जात पडताळणी कार्यालया कडून होणाऱ्या दिरंगाई बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला . तसेच एसबीसी प्रवर्गातील शिक्षकांचे प्रमोशन, केंद्रप्रमुख भरतीतील सामाजिक आरक्षण जाहीर करणे बाबत चर्चा करण्यात आली. समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील शिक्षकांना शैक्षणिक अभ्यासासाठी दिल्ली या ठिकाणी पाठवण्याबाबतच्या योजनेविषयी चर्चा झाली . जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी, तालुका पाटण येथील प्रदीप नामदेव गायकवाड यांना हजर करून घेण्याबाबत योग्य तो निर्णय देण्यात येईल असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुले साहेब यांनी सांगितले. वरील सर्व प्रश्न लवकरच सोडवण्यासाठी प्रयत्न करू व योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेस दिले. या बैठकीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर,
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. महेश खलिपे , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सौ. सपना घोळवे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र शेळकंदे यासह विविध विभागातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच शिक्षक संघटना जिल्हा सचिव चंद्रकांत म्हस्के, जिल्हा संघटक बाळकृष्ण भंडारे, सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.