सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न.
विवेक वार्ता भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या स्त्री - पुरूष पालकांची पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक जयंत केळकर हे होते. सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अमृत पोतदार यांनी केले. मागील सभेचा अहवाल वाचन वर्षा चौगुले यांनी केला. त्याचप्रमाणे सत्र एक व दोनचे निकाल वाचन राजीव आरते यांनी केले. तसेच शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या व घेतल्या जाणाऱ्या विविध बाह्य स्पर्धा परीक्षांची माहिती पी. बी पाटील यांनी करून दिली. त्याचप्रमाणे सत्र एक व सत्र दोन मध्ये केले जाणारे मूल्यमापन याबाबतची माहिती सौ यादव यांनी करून दिली.
या कार्यक्रमाला गुरुकुल संगीत विद्यालय पुणे चे श्री. गोविंद बेडेकर व सौ. मंजुषा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या शाळेत संगीताचे वर्ग सुरू करणार असल्याचं सांगितले. त्याचप्रमाणे पासवर्ड सामाजिक अभियान पुणे यांच्या इ. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन,
लेखन उपक्रम या अंकाचा शुभारंभ आनंद अवधानी, सौ. जोगळेकर, सौ. ठिपसे व श्री. घोडेस्वार यांनी या पालक सभेत केला. मुलांसाठी नव उपक्रमाची माहिती या अंकातून होणार असल्याचे सांगितले. व या वर्षीच्या अंकांचा सर्व खर्च सौ. अनघा चितळे यांच्या सहकार्यातून करण्यात आला असून मुलांसाठी हा अंक वर्षभर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे जे. के अकॅडमीचे महेश शेळके यांनी स्पर्धा युगात अकॅडमीचे महत्व व संस्थेच्या सहकार्याने अकॅडमीचे शाळेत सुरू असलेले वर्ग याबाबतची माहिती दिली. यानंतर पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्याध्यापक संजय मोरे यांनी उत्तरे दिली व त्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत केळकर यांनी शाळेबरोबर पालकांनीही मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आजच्या या पालक सभेसाठी संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे, संस्थेचे सचिव मानसिंग हाके,उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, जे. के अकॅडमीचे लाड सर, लांडगे मॅडम तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक व महिला, पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिंदे यांनी केले तर आभार सौ. गीता गावीत यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.