- कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय खरात यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
- विवेक वार्ता सातारा - जि. प शाळा, लाडेवाडी (केंद्र विरळी ) ता. माण जि सातारा या शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक, सातारा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय खरात यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी काणी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सिंधूताई वगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडूरंग लाडे, शाळेचे मुख्याध्यापक अजित हिंगे उपस्थित होते . यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मुख्याध्यापक अजित हिंगे यांनी सांगितले . यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय दिनकर खरात यांनी बहुजनांची मुले शैक्षणिक प्रवाहात आली पाहिजेत, टिकली पाहिजेत आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी या हेतूने हा उपक्रम सपूर्ण जिल्ह्यात राबवित असल्याचे सांगितले.
- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर मॅडम, केंद्रप्रमख श्री. अशोक गंबरे, शि. वि अधिकारी श्री. रमेश गंबरे, गटशिक्षणाधिकारी श्री लक्ष्मण पिसे, यांनी केले आहे. हा उपक्रम हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे कार्याध्यक्ष प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हा कार्याध्यक्ष उमेश गायकवाड सरचिटणीस दीपक माने, महिला आघाडीवर प्रमुख श्रीमती केशर माने यांच्या सहकार्यातून राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.