सांगली - राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय ब्ल्यू पँथरच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाहू रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये के. सी. सी हायस्कूल सांगली येथे कार्यरत असणाऱ्या सौ संगिता कांबळे यांचा सां.मि.कु.महानगर पालिका नगरसेवक विरेंद्र थोरात, पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सौ. कांबळे या गेल्या अनेक वर्ष उत्कृष्ट हिंदी अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शाहू रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना आदर्श, गुणवंत शिक्षिका पुरस्कार, हिंदी आध्यापक मंडळाचा गुणी अध्यापिका पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट स्काऊट पुरस्कार त्यांना मिळाला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षक बंधु-भगिनींच्या प्रश्नांचा पाठपुरावा त्या करीत असतात. या सन्मानाने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.