आपला भारत देश ७६वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार की ७७ वा ?

Admin

  आपला भारत देश ७६वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार की ७७ वा ?


     आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते आणि पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी या दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण एक वर्ष झाले होते.

यंदा भारत ७६वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार की ७७वा?

 दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. १९४७ रोजी १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गर्व करण्याचा दिवस आहे. आणि देशभरात उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस फक्त देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद म्हणून नव्हे तर देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्त्रीया, पुरुष, तरूण, कामगार,ज्ञात, अज्ञात क्रांतीकारक, यांना अर्पण केला जातो. आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण केले जाते.  मात्र, दरवर्षी स्वांतत्र्य दिवस जवळ आला की, लोकांच्या मनात प्रश्न असतो की, यंदा भारताला स्वंतत्र होऊन किती वर्ष झाली ?


     भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते आणि पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी या दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण एक वर्ष झाले होते. या आधारावर, यंदा २०२३ मध्ये, भारत ७६वा स्वातंत्र्यदिन (76th Independence Day)साजरा करत आहे आणि भारताने स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण केली आहेत.


  १९४७ मध्ये देशाने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता आणि म्हणूनच यंदा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जावा, असे मत मांडणारे देखील अनेक लोक आहेत. पण, अधिकृतरीत्या यंदा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. .यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम’ (नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट’ ) अशी आहे. 


      स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारने देशभरात  हर घर तिरंगा अभियानाची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. याशिवाय ‘माझी माती, माझा देश’ ही मोहिम देखील यंदा राबविण्यात येत आहे. 

जय हिंद.... जय भारत... 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top