"नव साक्षरता अभियान" सर्वेक्षणावर शिक्षक संघटना समन्वय समितीचा बहिष्कार :प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Admin

" नव साक्षरता अभियान" सर्वेक्षणावर शिक्षक संघटना समन्वय समितीचा बहिष्कार: : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन 


विवेक वार्ता सांगली - नुकतेच राज्य शासनाने परिपत्रक काढून केंद्र सरकार पुरस्कृत नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणावर प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे समन्वय समितीच्या बैठकीत जाहीर केले. याचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.मोहन गायकवाड  साहेब यांना देण्यात आले.

सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आवाहन  करण्यात येत आहे की त्यांनी कोणीही नव भारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम करू नये. समन्वय समितीच्यावतीने आजच्या बैठकीमध्ये समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश गुरव, अमोल माने, स्वप्निल मंडले, विनायक शिंदे, मुश्ताक पटेल, अमोल शिंदे, माणिक पाटील, अरविंद गावडे, चंद्रशेखर क्षिरसागर, दिवानजी देशमुख, शामगोंडा पाटील, गणेश गुरव, सलीम मुल्ला, म. ज.पाटील, तुकाराम सावंत, अमोल जाधव यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top