जेवणानंतर चहा, कॉफी पीत आहात ? सावधान...
विवेक वार्ता सांगली - काळजी आरोग्याची
बरेच लोक असे असतील की ज्यांना जेवणानंतर किंवा नाष्ट्यानंतर चहा पिण्याची सवय असते. चहा म्हटलं की अनेकांना स्वर्गातील अमृत वाटतं. अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाने किंवा कॉफीने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो. ताजेतवाने राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवणानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं ;पण ही सवय आरोग्याला, प्रकृतीला घातक ठरू शकते, धोकादायक ठरू शकते.
जेवणानंतर तातडीने चहा पिणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. चहा पावडर मध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ पोटातील प्रोटीन मध्ये मिसळतात त्यामुळे प्रोटीन टनक बनते परिणामी ते पचायला जड जात. त्यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणे टाळावे. याशिवाय चहामध्ये कॅफिन ही असते ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याच बरोबर कॅफिनचे अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल वाढवतं. त्यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसेच जेवल्यानंतर एक तासाच्या आत शरीरात अन्नामध्ये असलेले लोह मोठ्या प्रमाणात पचवण्याची क्रिया सुरू होते. जर चहा जेवणानंतर लगेच प्यायला तर शरीरात लोह पूर्णपणे पचत नाही आणि मग त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. तसेच जेवताना चहा पिल्याने शरीरातील कॅटकिन कमी होते कॅट किन हा चहा मध्ये आढळणारा एक घटक आहे जो आपल्या मानसिक स्थितीसाठी खूप महत्त्वाचा आहे.
तसेच चहाच्या अतिसेवनाने हृदयासंबंधीत आजर, मधुमेह आणि वजन वाढणे इत्यादी आजार निर्माण होण्याचा संभव असतो.चहामध्ये फॉर्लिफेनाँल्स आणि टेनिन इत्यादी घटक असतात जे जेवणातील लोह शोषत नाहीत. परिणामी शरीराला याचा फायदा होत नाही. विशेषतः महिलांमध्ये लोहाची कमतरता असते. त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरू शकते .
तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्या शिवाय राहूच शकत नसाल तर जेवणानंतर किमान एक दोन तासाने ग्रीन टी किंवा जिंजर टी चहा प्यावा .वास्तविक त्यात अँटीऑक्सिडंटस आणि पाँलीफेनाँलचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे पचनसंस्थेवर किंवा अन्न पचनावर जास्त परिणाम होत नाही. पण लागलीच पिण्यामुळे होणाऱ्या परिणामापेक्षा त्याची तीव्रता कमी होते. आदर्श स्थिती हीच सांगते की जेवल्यानंतर चहा पिणे टाळणे योग्यच.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.