लातूर जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनमोल सागर साहेब यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना लातूरच्या वतीने सत्कार.
विवेक वार्ता लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्हा परिषदेचे नुकतेच रुजू झालेले तरूण, तडफदार, कर्तव्यदक्ष नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनमोल सागर साहेब यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना लातूरच्या शिष्टमंडळाने शाल, पुष्पहार, भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती देवून
राज्य मुख्य संघटक राहूल गायकवाड, राज्य संघटन सचिव महेश कांबळे, जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, जिल्हा सरचिटणीस संजय राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम बलांडे, तसेच महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून बैठकीसाठीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साहेब यांनी बैठकीसाठी वेळ देण्याचे मान्य केले. आणि निवेदनात देण्यात आलेले सर्व प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. त्याचबरोबर संघटनेचे प्रशासनास नेहमीच सहकार्य राहील याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सत्कार समारंभास महिला पदाधिकारी व शिक्षक भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष छगन घोडके, रमेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानकुस्कर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बळीराम भोगे, महिला आघाडी प्रमुख सुनीताताई कांबळे, बाबासाहेब इंगळे, विशाल जोगदंड, राजकुमार गुंजरगे, मौजुद्दीन शेख, राजू सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, सोमेश कांबळे, संजीव कुमार सूर्यवंशी, शीला उघाडे, पंचशीला मस्के, दैवशाला गायकवाड, रंजीता शिंदे, वनमाला उघाडे, प्रणिता नवगिरे, जयश्री बनसोडे, सरोजा भोसले, वैशाली कांबळे, विजया उघाडे, गंगूबाई साखरे आदी पदाधिकारी शिक्षक बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.