तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी , विशेष निवड, पुरस्कार प्राप्त व सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार
विवेक वार्ता सांगली- सांगली जिल्हा तेली समाजाच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या तसेच इ. दहावी, बारावी, विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी, विशेष निवड, पुरस्कार प्राप्त , सेवानिवृत्त समाज बंधू भगिनींचा सत्कार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली शहर लिंगायत तेली समाजाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर व संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षल फल्ले, कार्याध्यक्ष मा. संजय विभुते (बापू),सचिव मा. निलेश संकपाळ,विजय तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संस्थेचे माजी अध्यक्ष कै. शशिकांत फल्ले यांचे अकस्मित निधन झाल्याने त्यांना समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अविनाश गाताडे हे होते. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना भविष्यातील करिअरच्या वाटा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सांगली शहर तेली समाजाच्या वतीने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हर्षल फल्ले यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय जालिंदर उर्फ बाळासो इंगळे यांची वाळवा तालुका मार्केट कमिटीच्या संचालक पदी निवड झालेबद्दल, निखिल तेली यांची डिग्रज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झालेबद्दल, अशोक विभुते यांची क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झालेबद्दल, विवेक संकपाळ यांना राज्यस्तरीय उद्योजक पुरस्कार मिळालेबद्दल, तुषार शिणगारे यांची येलूर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी निवड झालेबद्दल,
अलका विभुते यांची सांगली जिल्हा अंगणवाडी सेविका संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल, विजय तेली यांचे सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीच्या उप मुख्याध्यापक पदी निवड झालेबद्दल, अमर तेली यांची आष्टा अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाले बद्दल, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व वृक्षरोप देऊन विशेष सत्कार करण्यात आला .याचबरोबर शशिकांत शिणगारे व गोरखनाथ फल्ले यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व वृक्षरोप देऊन यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच इयत्ता दहावीतील 26 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, बारावीतील 7 तसेच पाचवी, आठवी स्कॉलरशिप गुणवत्ता प्राप्त , डिप्लोमा, डिग्री,सेट,नेट, पीएचडी इ.पदवी प्राप्त करणाऱ्या 29 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये दिव्या लोखंडे, ओम कारंडे, शिवानी तेली, सुहानी शिणगारे, अपूर्व कानकात्रे , मधुरा तेली, पारस फल्ले यांचा सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील फल्ले, श्रीकांत भागवत, सौ. लतिका हुंडरगी, शांताराम देशमाने (बापू), मनोहर पेटकर, प्रकाश शिंगारे, प्रताप देशमाने, कैलास देशमाने, निखिल तेली, श्याम वांगीकर, जीवन लोखंडे, उमेश कोरे, संजय चौगुले, महादेव तेली, सुमन वांगीकर,
सांगली शहराध्यक्ष रघुनाथ उबारे, सुधाताई कोरे, खजिनदार महालिंग हिंगे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय तेली, सुरेखा तेली यांनी केले. तर आभार रामचंद्र देशमाने यांनी मानले. संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.