मुख्याध्यापक मान्यता प्रक्रिया पारदर्शकपणे राबविले बद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे यांचा सत्कार.
विवेक वार्ता सांगली - सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे वतीने मुख्याध्यापक मान्यता, बदली मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यता प्रक्रिया पारदर्शकपणे राबविले बद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, घोटीबुद्रूक, ता. खानापूर व सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज, भिलवडी येथील मुख्याध्यापक मान्यता प्रक्रिया पारदर्शकपणे राबविले बद्दल मुख्याध्यापक श्री. डी. बी. कदम व मुख्याध्यापक श्री. संजय मोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या पारदर्शी कारभाराबद्दल मा. शिक्षणाधिकाऱ्याचे अभिनंदन करण्यात आले. याबद्दल भारती विद्यापीठ, पुणे संस्थेच्या वतीने, भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने व प्रशालांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले . याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी गिरी साहेब, दशवंत साहेब, कक्ष अधिकारी श्री. नारायण माळी साहेब, उल्हास भांगे साहेब, लिपिक सावंत मॅडम, नाझरे मॅडम, सुमित गोंधळे आदी प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे उपस्थित होते. संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.