ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू, परखड व्यक्तिमत्व प्रा. हरी नरके यांचे दुःखद निधन

Admin
ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू, परखड व्यक्तिमत्व प्रा. हरी नरके यांचे दुःखद निधन.
विवेक वार्ता सांगली - मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी रामचंद्र नरके यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांचे प्रकृती खालावली होती त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यांचे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परखड आणि स्पष्ट विचारांसाठी ते प्रसिद्ध होते. सध्या समाजात घडणाऱ्या घटनांवर ते व्यक्त व्हायचे, मत मांडायचे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी त्यांनी समग्र लेखन केले आहे. त्यांचा महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी निकटचा संबंध होता. सामाजिक विचाराने चळवळींना विचार पुरवण्याचे ते काम करत होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे .


प्रा. हरी नरके यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्रातील महापुरुषांचे लेखन कार्याचे संपादन करण्याचे देखील काम त्यांनी केले. राज्य सरकारच्या प्रकाशन विभागाने महापुरुषांचे ग्रंथ प्रकाशित केले होते या सर्वांचे संपादन  हरी नरके यांनी केले होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.

  हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत . असा हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आधारवड निघून गेल्याने चळवळीचे नुकसान झाले आहे. गेली अनेक दशके हे काम ते सातत्याने करत होते.  या थोर परखड विचारवंतास विवेक वार्ता च्या वतीने भावपूर्ण आदरांजली... 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top