भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. कृ. श्री. म्हसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
विवेक वार्ता सांगली -
भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. कृ. श्री म्हसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला प्रमुख पाहुणे प्रा. डाॅ. एस. एस पाटील, संस्थेचे संचालक जयंत केळकर, सहसचिव के.डी. पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत यांच्या हस्ते डॉ. म्हसकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक टी. एस पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संदीप सदामते यांनी करून दिला.
महाभारत कालखंडात ही विज्ञान होते व आजही जीवन जगत असताना विज्ञान आहे. असे विचार प्रमुख पाहुणे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे असे ही मत व्यक्त केले. यावेळी डॉ. एस. एन कुंभार , विज्ञान शिक्षक पी. बी. पाटील, प्रमोद काकडे, राजीव आरते,रोहित महेंद्रकर, श्रीमती शैलजा चौधरी, सर्व शिक्षक बंधु-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिल भोये यांनी केले तर आभार कु. ए. आर गुणाले यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.