कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे बाजीराव प्रज्ञावंत महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
विवेक वार्ता सांगली - सम्यक शिक्षण विचार मंच व कृती फाउंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षिकांचा राष्ट्रपिता जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श शिक्षिका पुरस्कार समारंभ संपन्न झाला. सुरुवातीला लोकप्रिय शिक्षक मा.आमदार जयंत असगावकर, मा. महावीर माने शिक्षण संचालक पुणे, मा.सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी,मा.अनुराधा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक इचलकरंजी,मा.ॲड. शिल्पा सुतार बाल कल्याण समिती सदस्य, मा.प्रमोद हर्षवर्धन, कार्यक्रम अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्रमुख वक्ते मा डॉ गिरीश मोरे सर तसेच सम्यक शिक्षण विचार मंच चे अध्यक्ष भिमराव संघमित्रा यांच्या हस्ते राष्ट्र पुरूषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या जडणघडणीत शिक्षक बंधु-भगिनी यांचा मोठा वाटा असतो. या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. या हेतूने या संस्थेने हे काम केले असल्याचे मा. आमदार जयंत आसगावकर त्यांनी सांगितले
या समारंभात कास्ट्राईब शिक्षक संघटना विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली अनेक वर्षे संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या निमित्ताने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.