सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये विविध उपक्रमांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन साजरा

Admin

सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये विविध उपक्रमांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन  जयंती व शिक्षक दिन साजरा. 


विवेक वार्ता सांगली - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतरत्न, थोर शिक्षणतज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सह सचिव के. डी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, ज्येष्ठ शिक्षक के. आर. पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


  यावेळी विश्वजीत फाउंडेशन, प्रजापिता ब्रम्हा कुमारी या सेवाभावी संस्थेच्या वतीने व रत्नाकर बॅंक शाखा भिलवडीचे वतीने शिक्षकांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. 



आजच्या या शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आज दिवसभरातील सर्व अध्यापन व प्रशासकीय काम पाहिले. यातून विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





    यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. श्रुतिका कुकडे, उपमुख्याध्यापक म्हणून तनिष्का मगदूम व पर्यवेक्षक म्हणून श्रावणी वाळवेकर यांनी काम पाहिले.  आजच्या या शिक्षक दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी तील सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात काणे प्रतिष्ठानच्या सांगली संगीत विद्यालयातील श्री फडके व मुखेडकर आणि त्यांच्या सहकार्यानी गुरूवंदना हा गायनाचा कार्यक्रम सादर केला.

  काही विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधु-भगिनींचा लेखणी, गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुष्का कोळी हिने तर आभार श्रावणी वाळवेकर हिने मानले. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top