श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचे टेनिक्वाईटमध्ये सुयश

Admin

 श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचे टेनिक्वाईटमध्ये सुयश


विवेक वार्ता हरिपूर-

     सांगली जिल्हा क्रीडा युवा संचालन पुणे संचलित जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा  आयडियल इंग्लिश स्कूल मिरज येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलींच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली . मुलांच्या १७ वर्ष वयोगटामधील संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. बी. पवार यांचे प्रोत्साहन तर सौ.पूजा पाटील व राजकुमार हेरले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी संघाचे अभिनंदन शाळेत करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ.संध्या गोंधळेकर, श्री.विठ्ठल मोहिते ,मनीषा वड्डदेसाई, हर्षदा काटकर, बबन शिंदे,सुनील खोत, अजितकुमार कोळी, सेवकवर्ग उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top