22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चात कास्ट्राईब शिक्षक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार

Admin

 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चात कास्ट्राईब शिक्षक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार


विवेक वार्ता सांगली - राज्य शासनाच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण तसेच प्राथमिक शाळांच्या समुहशाळा व दत्तक शाळा योजना या धोरणाला विरोध करण्यासाठी रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या  बहुजन शिक्षण हक्क  विचार मंच कृती समितीच्या महामोर्चाला कास्ट्राईब शिक्षक  संघटना पदाधिकारी, शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी  दिली. 


  राज्य शासन सध्या शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत क्षेत्रांबरोबरच सर्व सरकारी क्षेत्रामध्ये खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे धोरण राबवत असून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला हे धोरण मान्य होणार नाही. या धोरणामुळे सर्वसामान्य बहुजनांच्या मुलांचा अपेक्षाभंग होणार आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक दरी निर्माण होण्याची भीती आहे. खाजगीकरण आणि कंत्राटीकरण यामुळे तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण होणार आहे. तरुणांच्या हाताला जर कामच मिळत नसेल तर तरुण भरकटण्याची शक्यता निर्माण होणार आहे .पुढील पिढीच्या भविष्यासाठी या मोर्चात सहभागी व्हावे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेऊन नशिबाचा मावणाऱ्या तरुणांबरोबरच पालक, शेतकरी ,कष्टकरी जनता  या सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन  विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले आहे. तसेच या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

   यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सचिव विद्याधर रास्ते, उपाध्यक्ष उत्तम मंगल, कार्याध्यक्ष सुरेश कोळी, महिला आघाडी प्रमुख  संगीता कांबळे, कोषाध्यक्ष दयानंद सर्वदे, महापालिका क्षेत्राध्यक्षा पुष्पा माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top