विकास कामासाठी बेवणूरकरांनी पाठपुराव्यामध्ये सातत्य ठेवावे. - पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे.

Admin

 विकास कामासाठी बेवणूरकरांनी पाठपुराव्यामध्ये सातत्य ठेवावे. - पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे


विवेक  वार्ता जत- बेवनूर ता. जत येथील ग्रामदैवत   तीर्थक्षेत्र श्री. म्हसोबा देवस्थान घाट माथा बांधकामाचे उदघाट्न  बेवनूर गावचे सुपुत्र व कर्तव्य दक्ष अधिकारी पुणे विभागीय उपायुक्त (महसूल) रामचंद्र शिंदे व कर्नल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.बेवनूर येथील म्हसोबा मंदिरास नुकताच तीर्थ क्षेत्र म्हणून 'क' वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामधून मागील वर्षाच्या विकास निधीतून   ग्रामपंचायतीने  सुचवल्या नुसार मंदिरास घाट माथा बांधण्यासाठी तीन लाख रु मंजूर होते.यावेळी  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन तथा शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष विनायकराव शिंदे,इंजि.बाळासाहेब शिंदे,युवा उद्योजक संतोष वाघमोडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रामचंद्र शिंदे यांनी बेवनूर गावास निसर्ग सौंदर्य खूप मोठे लाभले असून त्यादृष्टीने आपणही समाजिक भान ठेवून विकास कामासाठी सतत पाठपुरावा केल्यास विकास निधी उपलब्ध होतो,याशिवाय बेवनूर गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही मॉडेल स्कुल व्हावी यासाठी  प्रयत्न करण्याचे वचन देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा नेहमी उंचावत रहावा असे आवाहन केले.

याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने  गावाच्या विकासासाठी नेहमी सहकार्य करणारे अधिकारी व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रामचंद्र शिंदे साहेब,कर्नल पाटील साहेब, विनायकराव शिंदे,इंजि. बाळासाहेब शिंदे व बेवनूर गावचे माजी सरपंच दादासाहेब वाघमोडे, कॉन्ट्रक्टर नितीन चव्हाण    यांचा सत्कार करण्यात आला.

   प्रस्ताविक तंटामुक्त अध्यक्ष विश्वास देशमुख यांनी केले तर शेवटी आभार मानताना विनायकराव शिंदे यांनी मानले. 

यावेळी बेवनूरचे सरपंच  सुभाष कांबळे,उपसरपंच पोपट शिंदे,बेवनूर विकास सोसायटी चेअरमन समाधान सरगर,व्हा चेअरमन भाऊसाहेब शिंदे, पोलीस पाटील महादेव शिंदे सर,ग्रामपंचायत सदस्य राजाराम वाघमोडे, तुकारामबापू नाईक, भीमराव खरात,विष्णू सरगर,मारुती सरगर, गौतम गायकवाड, विकास सोसायटी संचालक अप्पासाहेब शिंदे,संतोष शिंदे,महादेव पारेकर, मा सरपंच तानाजी सरगर, मा उपसरपंच प्रविणकुमार वाघमोडे,सुरेश शिंदे,मधुकर शिंदे,दादासाहेब सरगर,मेजर रामदास शिंदे,यशवंत सरगर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top