कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने रविवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण.
सांगली - प्रतिवर्षी प्रमाणे कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा स्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण रविवार दि. १५ आँक्टों. रोजी सकाळी ११.३०वाजता सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या उद्योगरत्न वेलणकर सभागृह होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अमर कांबळे हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्ट्राईब जेष्ठ नेते मा. नामदेवराव कांबळे हे आहेत. तर उद्घाटक म्हणून मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे व शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे हे आहेत. तसेच मा. रंगराव आठवले, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी, गौतम वर्धन, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, बाजीराव प्रज्ञावंत, विभागीय अध्यक्ष, महेश कांबळे, लेखाधिकारी कोल्हापूर, संजय कुर्डूकर, मा.नितीन गोंधळे ब्ल्यू पँथरचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी सुमारे वीस माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी दिली. यावेळी सचिव विद्याधर रास्ते, कार्याध्यक्ष सुरेश कोळी, महिला आघाडी प्रमुख संगिता कांबळे, उपाध्यक्ष उत्तम मंगल, प्रदीप गवळी, मुख्य संघटक अशोक हेळवी, सह संघटक सचिव अण्णासाहेब कुरणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.