महिलांना मानसन्मान संविधानामुळेच प्रा- अमर कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण
सांगली प्रतिनिधी - जर एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल, समाज शिक्षित होईल व समाजाला नवी दिशा प्राप्त होईल. तसेच आजच्या स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेली संधी ही संविधानाची देण असल्याचे प्रतिपादन प्रा. अमर कांबळे यांनी व्यक्त केले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा नगर वाचनालय येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख वक्ते प्रा. अमर कांबळे, आदरणीय नामदेवराव कांबळे, राज्य सरचिटणीस आकाश तांबे, मनपा शिक्षण प्रशासनाधिकारी रंगराव आठवले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, ब्ल्यू पॅंथरचे संस्थापक नितीन गोंधळी, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांचा मान सन्मान संविधानामुळे अबाधित असून महिलांनी आपले कुटुंब सुसंस्कृत बनवावे तरच संस्कृती टिकून राहू शकते. आपले हक्क संविधानामुळेच अबाधित असून यासाठी महिलांनी समाज सुसंस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावे असे विचार प्राध्यापक अमर कांबळे यांनी व्यक्त केले.तसेच आजची शैक्षणिक स्थिती फार कठीण बनली आहे. भविष्यात मुलांना नोकरी उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती नसल्याचे मत सरचिटणीस आकाश तांबे यांनी व्यक्त केले.
आजच्या या कार्यक्रमात सौ. पुष्पा माळी, श्रीमती मनीषा कोळी, सौ. सुप्रिया चव्हाण, सौ. माया वाघमारे, सौ. कविता कांबळे, सौ. विश्रांती कुरणे, सौ. रुक्मिणी शिंदे, सौ. किरण मोरेलवार, सौ. मंगल पाटील, सौ. प्रियांका देशमुख, सौ. संगीता शिंदे,सौ. विशाखा थोरात, सौ. प्रबोधिनी पतंगे, सौ. अनुराधा शिंदे, सौ. संगीता कांबळे, सौ. अवंतिका वाघमारे, सौ. रुपाली तेली, सौ. मीना जाधव व राजश्री पेटारे या शिक्षिकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, अधिक्षक नारायण माळी, विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, प्रा. सुनील घस्ते पी. डी. सरदेसाई, शिक्षक परिषदेचे राजेंद्र नागरगोजे, सचिव विद्याधर रास्ते, कार्याध्यक्ष सुरेश कोळी, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे, मुख्य संघटक अशोक हेळवी, सहसंघटक अण्णासाहेब कुरणे, उपाध्यक्ष प्रदीप गवळी, उत्तम मंगल, महिला आघाडी प्रमुख सौ संगीता कांबळे, कडेगाव तालुका अध्यक्ष भगवान भंडारे, खानापूर तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष अध्यक्षा पुष्पा माळी, जिल्हा सदस्य अनिता प्रज्ञावंत, संघटन सहसचिव तय्यबली नदाफ, यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांनी तर आभार जिल्हा सचिव विद्याधर रास्ते यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.