भिलवडी शिक्षण संस्थेच्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;३८१ दात्यांनी केले विक्रमी रक्तदान

Admin

      भिलवडी शिक्षण संस्थेच्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;३८१ दात्यांनी केले विक्रमी रक्तदान


भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात ३८१ इतक्या विक्रमी रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सेकंडरी स्कूल अँण्ड  ज्युनिअर कॉलेज भिलवडी,व्यापारी संघटना भिलवडी,भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.हनुमान मंदिर भिलवडी, भिलवडी शिक्षण संकुलातील बाबासाहेब चितळे सभागृह या  ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी दात्यानी मोठी गर्दी केली.



शिरगावकर ब्लड बँक ,आदर्श ब्लड बँक,सिद्धिविनायक ब्लड बँक,आधार ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.आष्टा येथील स्पंदन हॉस्पिटल व आदित्य डायग्नॉस्टिक सेंटरच्या वतीने डॉ.सुमित कबाडे व डॉ.अमृता कबाडे यांनी ३१० जणांची सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी केली.या वेळी 



भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त डॉ.सुहास जोशी,संचालक गिरीश चितळे, डॉ.सुनिल वाळवेकर,संजय कदम, प्रा. आर.डी.पाटील,जयंत केळकर,दादासाहेब चौगुले,निखिल चितळे, संस्था सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,सरपंच सौ.विद्या पाटील, भिलवडी व्यापारी संघटनेचे रमेश पाटील,सुबोध वाळवेकर,दिपक पाटील,राजू अष्टेकर, राजेंद्र तेली आदींसह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,सेकंडरी स्कूल अँण्ड  ज्युनिअर कॉलेजचे भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, प्रा.जी.एस.साळुंखे,प्रा.पी.पी.पाटील





,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्मिता माने,प्रकाश गोसावी बालवाड़ीच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी,सेमी इंग्लिश स्कूलचे तुषार पवार, उपस्थित होते.

 रक्तदात्यांचा करूया सन्मान...माझी  संस्था माझा अभिमान.. अशा घोषणा देत सहभागी शिक्षक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,माजी विद्यार्थ्यांनी  सर्व रक्तदाते,संयोजकांचे  अभिनंदन करण्यात आले .


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top