प्रतिष्ठा फौंडेशनच्या स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका पुरस्काराने सौ. रूपाली कांबळे सन्मानित.

Admin

  प्रतिष्ठा फौंडेशनच्या ' स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका ' पुरस्काराने सौ. रूपाली कांबळे सन्मानित.  


 विवेक वार्ता सांगली (प्रतिनिधी) -   विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणेसाठी प्रतिष्ठा फौंडेशन, सांगलीचे वतीने शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सांगली जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी मा. तृप्ती धोडमिसे, डॉ. जयश्री पाटील,मा. ज्योती संजयकाका पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  यामध्ये भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां, रिपब्लिकन पक्षाच्या पलूस तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. रूपाली नंदकिशोर कांबळे   यांना  स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. रूपाली कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते  सौ . शरयू   पाटील,  सौ. हेमलता  देसाई , सदस्य बाल न्याय मंडळ सांगली, डॉ. जयश्री  श्रेणीक पाटील , संस्थापक अध्यक्षा प्रतिष्ठा फौंडेशन, सचिव सौ. विद्या जाधव, संतोष औंधकर  , उद्योजक नंदकिशोर कांबळे  आदी उपस्थित होते .

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top