कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे- जयंत आसगावकर

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे- जयंत आसगावकर 

कास्ट्राईबच्या वतीने  आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण 


कोल्हापूर प्रतिनिधी - क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी ठेवून आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून शिक्षण व्यवस्थेला ऊर्जा देणारे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन शिक्षक  आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. 

      शाहू स्मारक येथे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.तसेच"शिक्षण प्रक्रियेतील सध्याची स्थित्यंतरे स्विकारून शिक्षक बदल स्विकारत आहेत,पण शासनाचे काही जाचक,अहिताचे निर्णयाला सातत्याने विरोध करून बहुजनांचे शिक्षण टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.याकामी  राज्यात  कास्ट्राईब संघटनेचे कार्य उल्लेखनीय आहे" असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते." प्रगत देशांची शिक्षणप्रणाली स्विकारून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल व्हावेत,गोरगरिबांचे शिक्षण टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित लढा उभे करण्याची गरज आहे., देशातील निवडणुका जेव्हा शिक्षण या मुद्द्यावर होतील तेव्हाच विकसनशीलतेचा प्रवास विकासाकडे मार्गक्रमण करेल "असे विचार व्यक्त केले .

    यावेळी शिक्षक संघटना राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी  संघटना राज्यस्तरावर मागासवर्गीयांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत आहे.,महापुरुषांच्या  विचारांचा वारसा नवोदित पिढीने नेटाने चालवण्याची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  नामदेवराव कांबळे यांनी महात्मा फुले उत्कृष्ट शेतकरी, व्यापारी,ठेकेदार,साहित्यिक समाजसुधारक, आदर्श शिक्षक या भूमिकेतून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला.,यावेळी जिल्ह्यातील उपक्रमशील १५ शिक्षक आणि विशेष कार्य करणाऱ्या ८ गुणिजनांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

      यामध्ये दिनकर  परीट, राजेंद्र  जाधव, मनिषा  सुतार, अमित मुंजारे ,अशोक कांबळे , बाबासो  कांबळे, सुरेश जाधव सुखदेव  कदम,  तानाजी  कांबळे,  अमित मेधावी, अश्विनी  कांबळे, बापू  सोरटे,  महादेव  कांबळे, श्रीकांत  कांबळे,अनंत   कांबळे, आदी शिक्षक बंधु-भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष पुरस्कार देऊन कु . ऐश्वर्या जाधव - उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार ( विम्बल्डन लॉन टेनीस ),अन्वी  घाटगे - उत्कृष्ट जागतीक बाल गिर्यारोहक , संदिप  कांबळे - उत्कृष्ट बौद्धाचार्य, मिलींद  चंद्रमणी - कृषी उपसंचालक वर्ग -1 MPSC तुन निवड,आदित्य  जगदीश - PHD - Agree .. श्रीधन  प्रधान - AIIMS - रायपुर MBBS निवड. दिव्या  कांबळे - AllMS - नागपूर MBBS निवड  धैर्यशील कांबळे -  IIser - इंडीयन रिसर्च इन्स्टिट्यूट भोपाळ - निवड आदींचा शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 


  यावेळी शिक्षण उपसंचालक महेश चोथे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी विचार व्यक्त केले , शुभेच्छा दिल्या.यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गस्ते सर, कोषाध्यक्ष तुकाराम संघवी, कार्याध्यक्ष पि. डी सरदेसाई, यशवंत सरदेसाई, ए. एल कांबळे,  सुखदेव कदम, विजय कांबळे, अशोक कांबळे, तानाजी घसते, राखी तारळेकर,विद्या कांबळे, हेमलता कुर्डूकर, सुनंदा जगदीश, अस्मिता साबळे, आकाराम कांबळे, जनार्दन कोतेकर, दयानंद म्हेत्तर, वसंत देसाई, बी एस कांबळे, डी एस कौशल, गणपत गायकवाड, दिनकर जगदीश, विनायक प्रधान, विलास जाधव, एम एस कांबळे, सुरेश कदम, सहदेव कांबळे, बाजीराव कांबळे, छाया वर्धन, डि. के कांबळे, मनीष कांबळे ,विजय कांबळे ,सुरेश देशमुख, जी के कांबळे, बाबासाहेब सोरटे, सदाशिव कांबळे, सर्जेराव कांबळे,  रमेश कांबळे, भीमराव तराळ, मधुकर जरळी, नंदकुमार कांबळे आदीसह शिक्षक, संघटनेचे कार्यकर्ते,सत्कारमूर्तीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी तर आभार संजय कुर्डूकर यांनी मानले. 

-

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top