कोंडाबाई साळुंखे हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी
हरिपूर प्रतिनिधी - दि.२६ येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन केले.
स्वागत व प्रास्ताविक श्री.राजकुमार हेरले यांनी केले. याप्रसंगी श्री.विठ्ठल मोहिते यांनी संविधान निर्मितीचा इतिहास सांगितला. यावेळी ते म्हणाले, "भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून; न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रवर्धित करणारे आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मता टिकवणारे आहे. आपण सर्वांनी या संविधानाचा आदर राखून; अभिमान बाळगला पाहिजे. संविधान हाच भारतीय लोकशाहीचा धर्मग्रंथ आहे. त्याप्रमाणे सर्वांनी आचरण केल्यास समृद्ध आणि समाधानी भारत निर्माण होईल."
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची घोषणा फलकासह हरिपूर गावातून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी "लोकशाहीचा जागर- संविधानाचा आदर, संविधानाचा सन्मान- हाच आमचा अभिमान, संविधानाने दिला मान- स्त्री पुरुष एकसमान" अशा घोषणा दिल्या. याचे संयोजन पूजा पाटील, हर्षदा काटकर, मनीषा वड्डदेसाई, अजितकुमार कोळी, बबन शिंदे, सुनील खोत, प्रल्हाद वडर, भाऊ माने यांनी केले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.