सेकंडरी स्कूल मध्ये भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

Admin

  सेकंडरी स्कूल मध्ये भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न. 


 भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये इ. आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा अंतर्गत भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणारी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न झाली.    मुलांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कळावे, भूगोल विषयाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने गेली १२  वर्षे या परीक्षेचे आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील मुलांसाठी केले जाते.


 यावर्षी इयत्ता आठवी  ते बारावी  मधील ४६० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. परीक्षेचे समन्वयक म्हणून माध्यमिक विभागाचे श्री. ज्ञानेश्वर भगरे  सर व उच्च माध्यमिक विभागाचे श्री. महेश पुजारी सर यांनी  काम पाहिले . यांना सहाय्यक म्हणून भूगोल विषय शिक्षिका सौ. रौनक  तांबोळी , वैशाली सूर्यवंशी  यांचे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय मोरे सर उपमुख्याध्यापक श्री. विजय तेली सर व पर्यवेक्षक श्री. विनोद सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top