वाढली थंडी घ्या आरोग्याची काळजी... थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्याल...

Admin

 वाढली थंडी घ्या आरोग्याची काळजी... 

थंडीच्या काळात  आरोग्याची काळजी कशी घ्याल... 


विवेक वार्ता -

दिवाळी पाठोपाठ यंदा कडाक्याची थंडी पडली आहे. सकाळी हुडहुडी भरविणारी थंडी,दुपारी दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव सध्या घेत आहोत . उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते बरं का? त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर तुम्हीही ‘फिट’असायला हवं!

हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू. परंतु, थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्‍यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साधारणपणे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात.थंडीत ताप येणे, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शीतपेये, शीतपाणी किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जीदेखील होऊ शकते.


तज्ज्ञ सांगतात...

थंडीच्या लाटेचा फटका नागरिकांना बसू शकतो. परंतु,  तीव्र अशी थंडीची लाट येत नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी, वातानुकूलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्‍वसनाचे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

ही घ्यावी काळजी? 

थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल.  नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.  शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते.  रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.

या गोष्टी लक्षात ठेवा. 

या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.

तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा.

विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना, अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे.

थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.हिवाळ्यातील कडक थंडीत वृद्धांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी  ऑक्टोबर हिट तसेच गरमीच्या काळात आहार कसा असावा  . थंडीचे दिवस हे विविध कारणांनी अनेकांना आवडत असले तरी या काळात अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. विशेषतः वृद्धांना थंडीचा त्रास होतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिस सारखा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वृद्धांनी थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी?आहारात कोणत्या वस्तूंचा समावेश करावा. याबद्दल जाणून घेऊ. 


बाहेर पडताना गरम कपडे

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यामुळे वृद्धांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त गरम कपडे, स्वेटर, पाय आणि हातमोजे, टोपीचा वापर करावा. अनेकांना मॉर्निंग वॉकची सवय असते. मात्र थंडीच्या दिवसात पहाटे बाहेर पडणे शक्यतो टाळावे किंवा गेलातच तर गरम कपडे घालणं गरजेचं आहे. 

आहारात गरम पदार्थांचे सेवन

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात गरम पदार्थांचे सेवन करा. जेणेकरून शरीरातील आंतरिक तापमान हे संतुलित राहण्यास मदत होईल. तिळाचे सेवन, गुळाचे सेवन, सुकामेवा आणि सोबतच बाजरीची भाकर अशा प्रकारच्या गरम पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील तापमान योग्य राहील. तसेच रक्त गोठण्याच्या समस्ये पासूनही बचाव होऊ शकतो. सोबतच चांगले आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणंही महत्त्वाचं असतं. 

वेळेवर औषधी आणि त्वचेची काळजी

हिवाळ्यामध्ये जेवण केल्यावर किंवा जेवणाच्या आधीच्या आपल्या ज्या नेहमीच्या औषधी असतील तर त्याही वेळेत घेणं गरजेचं आहे. सोबतच त्वचेची काळजी ही महत्त्वाची ठरते. कारण वृद्धांची त्वचा आधीच कोरडी आणि सुरकुत्या पडलेली असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागेल. त्वचेवर व्यासलीन किंवा चांगलं मॉइश्चरायझर लावावं. त्या व्यतिरिक्त मोहरीचं तेल तुम्ही त्वचेवर लावू शकता. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा धुके पडलेले दिसते. तर अशा वातावरणात श्वसनाचे आजार किंवा अस्थमाच्या रुग्णांनी बाहेर पडणे टाळावे. विशेषतः पहाटेच्या दरम्यान असलेल्या थंडीत अस्थमाचे रुग्णांनी बाहेर जाणे टाळलेले बरे. बाहेर गेल्यास हातमोजे, पाय मोजे, स्वेटर, कान टोपी आणि बूट घालून बाहेर जावे. जेणेकरून श्वसन प्रक्रियेला काही त्रास होणार नाही. सोबतच सर्व व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकले तर त्वचेची स्निग्धता टिकून राहील, असे सांगितलं जाते 

रात्री आणि पहाटेच्या दरम्यान तापमानात चांगलीच घट झालेली दिसून येते. ही थंडी वृद्धांना अनेकदा सहन होत नाही. त्यामुळे हृदयविकार किंवा पॅरलिसीस म्हणजेच लकवा यासारखे परिणाम जास्त दिसून येतात. यापासून वृद्धांनी स्वतःला वाचवून योग्य संतुलित आहार, योग्य वेळी औषधी, गरम कपड्यांचा वापर, भरपूर पाणी पिणे तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे ठरते.

हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र, थंडी, धुक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बाळावण्याची शक्यता जास्त असते. उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे.






संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top