मारुती नवलाई आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्काराने सन्मानित. .

Admin

 मारुती नवलाई  आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्काराने सन्मानित . 


मिरज प्रतिनिधी - . सांगली येथील वृत्तपत्र क्षेत्रात गेली ३५ वर्षे अखंड सेवेत असलेले  सामाजिक कार्यकर्ते ,दुर्मिळ साहित्य संग्रहक मारुती नवलाई यांना यंदाचा ६ जानेवारी पत्रकार दिनी व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी मिरज येथे ऑल रजिस्टर न्यूज पेपर्स असोसिएशन च्या वतीने आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार बहाल करण्यात आला . या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती अधिकारी सौ संपदा बिडकर व जिल्हा सरकारी वकील मा. बाळासाहेब देशपांडे, मा. डॉ. सागर बोराडे, जि. म. बँकेचे संचालक वैभव शिंदे तसेच या संस्थेचे सचिव दीपक ढवळे नामवंत ज्येष्ठ निवेदक विजय कडणे सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख विजयराज पोद्दार आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 मारुती नवलाई हे गेली अनेक वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना सामाजिक  बांधिलकीतून त्यांनी असंघटित क्षेत्रातील व वृत्तपत्र विक्रेत्यांना एकत्रित केले व संघटना स्थापन करून अनेक समस्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वाचन चळवळ घडवून आणली. कॉलेजच्या जीवनापासूनच अनेक स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होऊन कार्यरत राहिले. तसेच वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर शहर अध्यक्ष तसेच महापालिका क्षेत्राध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राज्य केंद्रीय संचालक पदापर्यंत कार्यरत असून आता राज्य संघटक म्हणून कार्य करीत आहेत. अनेक संस्थेवर पदाधिकारी व संचालक म्हणून काम पाहतात. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले भूमिभूषणचे संपादक मारुती नवलाई यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top