कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी - कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मागासवर्गीय अनुशेष किती आहे याचा आढावा घेऊन तो पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका , मुख्याध्यापक यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात यावा. व त्यासाठी येत्या 18 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मेळावा आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आले .प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दीपकभाई केसरकर,कोकण शिक्षक आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ केला जाईल. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकावार बैठकांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी मार्गदर्शन करताना कास्ट्राईब शिक्षक संघटनेची कागदपत्रे सभासदांसमोर सादर केली .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र ,घटना व नियम सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. कास्ट्राईब शिक्षक संघटना ही फक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत संघटना आहे. या संघटनेमधून श्री. कृष्णा इंगळे यांना बडतर्फ केले आहे. सदर प्रस्ताव अप्पर कामगार आयुक्त नोंदणी कार्यालय नागपूर यांना सादर केलेला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांच्या बाबतीमध्ये काही लोक जाणून-बजून अपप्रचार, अफवा पसरवत आहेत. त्यांना फार महत्त्व न देता ,आपण संघटनेच्या कामांमध्ये लक्ष द्यावे.
यावेळी प्रदेश सदस्य डॉ. पारस जाधव, ज्ञानेश्वर कुंबरे (देवगड ) , प्रा.मारुती कांबळे (सावंतवाडी) सुनील घस्ती (जिल्हाध्यक्ष),निलेश तांबे (कणकवली) राजेश तांबे (तळेरे) सौ .चंद्रकला तांबे (वैभववाडी) सुधीर तांबे (मुख्याध्यापक नांदगाव ) मिलिंद जाधव ( फोंडा) विकास पवार (वाडा- देवगड), आनंद कांबळे ( कणकवली) समीर नाईक ( कुडाळ) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.