कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आकाश तांबे यांची, कार्याध्यक्षपदी रविंद्र पालवे यांची एकमताने निवड.

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी आकाश तांबे यांची, कार्याध्यक्षपदी रविंद्र पालवे यांची एकमताने निवड.


कोल्हापूर प्रतिनिधी - शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत लढणारी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यच्या राज्याध्यक्षपदी मा. आकाश तांबे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी मा. रविंद्र पालवे यांची निवड एकमताने  करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ४ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी केले. मागील सभेचे अहवाल वाचन आकाश तांबे यांनी केले.आर्थिक ताळेबंद सादर करण्यात आला.


 

सभे पुढील सर्व विषय मोठ्या आवाजी मताने मंजूर करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणीचा कार्यकाल संपला असल्याने राज्याध्यक्षपदी मा. आकाश तांबे व कार्याध्यक्षपदी मा. रविंद्र पालवे यांची  एकमतांने निवड करण्यात आली. त्यानंतर राज्य कार्यकारिणी गठीत करण्याचे सर्व अधिकार मा. राज्याध्यक्षांना देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी साठी प्रत्येक जिल्ह्यातील चार सदस्य घ्यावे असे ठरले. लवकर राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले .  वेळी राज्यभरातून असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून नूतन अध्यक्ष आकाश तांबे कार्याध्यक्ष रविंद्र पालवे यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ मार्गदर्शक नामदेवराव कांबळे यांनी काम पाहिले. या सभेला राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सभासद शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top