छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक - अभिषेक खोत.
सांगली प्रतिनिधी - कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ जयंती मोठ्या उत्साहात वृत्तपत्र विक्रेता भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी मा. आभिषेक खोत, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाची बाजी लावणारे मावळे एकत्र केले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रयतेचे राज्य स्थापन केले. आज तरुणांनी महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. ध्येयाने प्रेरित होऊन काम केले पाहिजे. असे विचार अभिषेक खोत यांनी व्यक्त केले.
यावेळी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या कायदेशीर सल्लागारपदी जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी त्यांची निवड जाहीर केली. संघटनेच्या माध्यमातून विविध महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचे कार्य केले जाते. असे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी सांगितले. यावेळी भारतीय ब्ल्यू पँथरचे अध्यक्ष डॉ. नितीन गोंधळे, सचिव विद्याधर रास्ते, उपाध्यक्ष उत्तम मंगल, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे, मुख्य संघटक अशोक हेळवी,कार्याध्यक्ष सुरेश कोळी,संघटन सचिव आण्णासाहेब कुरणे, महिला आघाडी प्रमुख सौ. संगिता कांबळे, महापालिका क्षेत्र अध्यक्षा पुष्पा माळी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले तर आभार सचिव विद्याधर रास्ते यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.