विद्यार्थ्यांनो करिअरच्या नव्या वाटा शोधा : नाविण्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करा. " दादासाहेब गुरव

Admin

  "विद्यार्थ्यांनो करिअरच्या नव्या वाटा शोधा : नाविण्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करा. "  दादासाहेब गुरव 


विटा प्रतिनिधी -

 भारती विद्यापीठ संचलित, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक येथे शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ मधील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा 'शुभेच्छा समारंभ' संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डॉ.पतंगराव कदम विद्यालय, दौंडज चे माजी मुख्याध्यापक दादासाहेब गुरव हे होते. "विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणात नव्या वाटा शोधून नवनीवन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.आपल्या आईवडीलांनी व शिक्षकांनी केलेले कष्ट स्मरण करुन सातत्याने व चिकाटीने आपले ध्येय साकार करावे. भविष्य उज्वल आहे आपण आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल करावी" असे विचार त्यांनी केले.

 मुख्याध्यापक डी.बी.कदम म्हणाले की, भारती विद्यापीठ या ज्ञानगंगेत घडणारा विद्यार्थी हा यशाला गवसणी घालणारा ठरतो. आदरणीय साहेबांचे विचारांची व संस्काराची शिदोरी आपल्याला भविष्यात वेध घेण्याची उर्जा देईल. यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील यावर्षीचा निकाल १००% लागणार असून आपण सर्वांनी केलेल्या कष्टाचे चिज होईल. आगामी काळात आपण यश खेचून आणाल. विविध पातळीवर स्वतःला सिध्द करा. विद्यालयाचे हे ऋण सदैव अबाधित राहिल असे प्रतिपादन केले.

   यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करत  शाळेला भेटवस्तू प्रदान केली.

  याप्रसंगी शालिवान लोखंडे, बाजीराव प्रज्ञावंत, आंबवडे सर, संजयकुमार कोळेकर, नितीन चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दहावी च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांच्या अनुभवातून व आठवणींने वातावरण भावूक झाले. 

 या प्रसंगी मुख्याध्यापक डी.बी.कदम,  शालीवान लोखंडे, बाजीराव प्रज्ञावंत, संजयकुमार कोळेकर, आंबवडे सर, अनिल मगदूम, नितीन चंदनशिवे, मकरंद आमले, एबी पाटील, शब्बीर पटेल आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी साळूंखे हिने केले, सुत्रसंचलन साक्षी सगरे हीने तर आभार कशिश जाधव यांनी मानले.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top