कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे संपन्न होणार

Admin


 कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे संपन्न होणार

रत्नागिरी ‌प्रतिनीधी .- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्च २०२४ रोजी कास्ट्राईब  शिक्षक  संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे  होणार असल्याची  घोषणा राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी केली. नुकताच रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा  स्नेह मेळावा पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष आकाश तांबे हे  होते. यावेळी त्यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची भूमिका, कार्यपद्धती तसेच राज्यातील शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली. भविष्यकाळात शिक्षणाचे पूर्णतः  खाजगीकरण होणार आहे व  खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तेव्हा शिक्षकांनी जागृत राहिले पाहिजे, संघटित असले पाहिजे आणि शिक्षण चळवळीचा भाग बनले पाहिजे असे आवाहन केले.


    यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, पी. डी सरनाईक, सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे ,रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रदीप पवार, चिटणीस प्रशांत जाधव, एस टी सेल प्रमुख,अतिरिक्त सरचिटणीस प्रमोद गमरे ,कुणाल तडवी ,उपाध्यक्ष दिलीप तांबे, संदीप थोरवडे, संघटक प्रल्हाद सरगर  ,तालुका सरचिटणीस अनिल चव्हाण, संचालक बिपिन मोहिते,हिरालाल चावरे,तालुका उपाध्यक्ष उमेश तायडे,मंडणगड तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव ,चिपळूण तालुकाध्यक्ष देविदास शिंदे,संगमेश्वर तालुकाध्यक्ष युवराज कांबळे, गुहागर सचिव व तज्ञसंचालक राजेश गायकवाड ,खेड चे किशोर धुत्रे, तसेच सांगली, कोल्हापूर, व सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


  याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील शिक्षकांना, गुणवंत विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे सर यांनी केले तर आभार सरचिटणीस अनिल चव्हाण  यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top