सावित्री बाई फुले जागतिक कीर्तीच्या महिला शिक्षिका-राज्याध्यक्ष आकाश तांबे

Admin

 सावित्री बाई फुले जागतिक कीर्तीच्या महिला शिक्षिका-राज्याध्यक्ष आकाश तांबे 


सातारा ‌‌प्रतिनीधी-जागतिक महिला दिनानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  पहिले महिला राज्य अधिवेशन, नायगाव जि.सातारा येथे संपन्न झाले.प्रमुख पाहुण्यां म्हणून नायब तहसीलदार सौ.रूपाली पोळ या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे हे होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात आकाश तांबे  यांनी सावित्रीबाई फुले या जागतिक कीर्तीच्या महिला शिक्षिका  आहेत. सावित्रीबाई फुले यांनी केलेलं शैक्षणिक व सामाजिक कार्य याची जगाने नोंद घेतलेली आहे. सावित्रीबाई फुले  यांना अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचं कार्य  महिला भगिनींनी पुढे चालू ठेवावे .मुलींमध्ये सावित्रीबाई फुले यांचा संस्कार रुजवावा,  शिक्षण चळवळ ही अधिक गतिमान करावी असे विचार त्यांनी व्यक्त केले. 



अधिवेशनामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान करण्यात आला  श्रीमती पोळ (नायब तहसीलदार रोजगार हमी योजना,जि. प. सातारा)  कॉमग्रेड श्रीमती कमल कोंडके ( सामाजिक कार्यकर्त्या), डॉ .सौ.  संघमित्रा फुले (अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी) , सौ.साधना नेवसे ( सरपंच नायगाव) आणि   डॉ. वंदना वाहुळ, शिक्षण उपसंचालक (माध्यमिक उच्च माध्यमिक .पुणे) यांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व प्राध्यापक हरी नरके लिखित महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले. यावेळी  राज्यभरातून आलेल्या१५० महिला शिक्षकांना  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका  पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले. 



प्रमुख पाहुणे म्हणून सौ .रुपाली पोळ (नायब तहसीलदार जिल्हा रोजगार हमी योजना सातारा ) यांनी मी नायगाव मधील सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू झालेल्या डीएड कॉलेजमध्ये मध्ये मी  शिक्षिकेचे धडे घेतलेले आहेत.  त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वारसा घेऊन आज मी या पदावर काम करत आहे असे प्रतिपादन केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमल कोंडके यांनी मागील ५० वर्ष आपण फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांच्या  चळवळीमध्ये काम करत आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे . श्रीमती कमल कोंडके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वर एक सुंदर कविता वाचन केलं, सर्व महिलांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कमलताई कोंडके यांच्या हस्ते अनेक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी च्या अधिक्षिका डॉ .सौ संघमित्रा फुले यांनीही   अधिवेशनामध्ये विचार मांडले. त्यांचाही कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले कर्तृत्वान महिला म्हणून सन्मान करण्यात आला. 


राज्यभरातून आलेल्या अनेक महिला शिक्षकांनी आपले मनोगते व्यक्त केलीत यामध्ये सांगली जिल्ह्यातील विनोदिनी मिरजकर (राज्य कार्यकारिणी सदस्य ), संगीता कांबळे,पुष्पा माळी, सातारा जिल्हातील कांचन सावंत, विभा रोकडे,सोलापूर मंजुषा इराकशेट्टी, श्रीशैला सोनकांबळे , कोल्हापूर जिल्हातील छाया वर्धन, हेमलता कुर्डुकर,सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील माधुरी तांबे यांनी मनोगते  व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा मोरे , कांचन  बल्लाळ व तर आभार सौ . शीतल भंडारे यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top