कास्ट्राईबच्या शिलेदारांचा गुणिजन गौरव पुरस्काराने सन्मान, प्रमोद काकडे ' गुरुगौरव शिक्षक रत्न ' पुरस्काराने तर संगिता कांबळे ' नारीशक्ती ' पुरस्काराने सन्मानित.
पुणे प्रतिनिधी - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारे गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ नुकताच पुणे येथे संपन्न झाला. या गुणिजन गौरव पुरस्कारासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे व महिला आघाडी प्रमुख सौ संगीता कांबळे यांची निवड करण्यात आली होती. राज्यस्तरीय ' गुणवंत गुरुगौरव शिक्षक रत्न ' पुरस्काराने जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांना गौरवण्यात आले. तर राज्यस्तरीय 'नारीशक्ती सन्मान' पुरस्काराने सौ. संगीता कांबळे यांना गौरविण्यात आले. मा. श्यामसुंदर सोन्नर महाराज, (प्रसिद्ध कवी, वक्ता, तत्त्वचिंतक) तसेच डॉ. सुनील सावंत, (प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत,) श्रीमती मेघा पांडे, डॉ. जे. सानीपिना राव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
मा. प्रमोद काकडे गेली अनेक वर्ष शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभागी असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊ मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. गेले २४ वर्षे हा सन्मान सोहळा पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येत असतो. पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील लोकांसाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी हा हेतू या पुरस्कार सोहळ्याचा असल्याचे डॉ. सुनील सावंत यांनी विचार व्यक्त केले.
त्याचबरोबर शिक्षण व इतर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान नारीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. संगीता कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती मेघा पांडे, जे सानीपिना राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मा. उत्तम मंगल यांची सांगली, कोल्हापूर विभागाचे समन्वयक म्हणून निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला एल. एस दाते, संयोजक, समन्वयक नारायण वाणी, अमोल सुपेकर आदी मान्यवर व सर्व महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने आलेले पुरस्कार मानकरी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.