जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा- प्राचार्य कणसे यांचे प्रतिपादन

Admin

 जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद

 गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा- प्राचार्य कणसे यांचे प्रतिपादन 


सांगली प्रतिनिधी - येथील पतंगराव कदम महाविद्यालय ,सांगली व जिल्हा मराठी अध्यापक संघ, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने 'गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार' वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.डी.जी.कणसे हे होते.

 याप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य कणसे म्हणाले की, 'सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद असून; मराठी भाषा समृद्ध करणारे आहे. उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन, त्यांना प्रेरणा देणारे आहे.आमचे महाविद्यालय मराठी अध्यापक संघाला सदैव सर्व प्रकारचे सहकार्य करेल." प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील म्हणाले की, "काळाच्या प्रवाहाबरोबर शिक्षकांनी स्वतः बदलले पाहिजे. ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित कराव्यात.अनेक नवी क्षेत्रं त्यांची वाट पाहताहेत.तसेच उत्तम साहित्याचा परिचय करून द्यावा .आपली मराठी भाषा आणि साहित्य मुलांचे मन समृद्ध करणारे आहे."


       प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर स्वागत श्री. विठ्ठल मोहिते यांनी केले. याप्रसंगी गुणवंत मराठी अध्यापक पुरस्काराचे वितरण प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे व प्रमुख पाहुणे प्रा.प्रदीप पाटील यांचे शुभहस्ते शाल ,श्रीफळ, सन्मानपत्र व पुस्तक देऊन करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन सौ.वैशाली आडमुठे व सुनील जाधव यांनी केले. पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. नेमिनाथ कोथळे (टाकळी-बोलवाड)  व श्री. संदीप पाटील (मुचंडी-जत) यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की ,'आम्ही सदैव मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील राहू'.


प्रा.सुभाष कवडे यांनी 'विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची  घोषणा करून; मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण केले.

     याप्रसंगी प्रा. डॉ. विष्णू वासमकर,प्रा.सुभाष कवडे, शाहीर पाटील, प्रकाश वायदंडे ,दिलीप पवार, मराठीचे शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.सुरेखा कांबळे यांनी केले तर आभार श्री.रमेश पाटील यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top