सकारात्मकतेने प्रयत्नशील राहा यश तुमचेच" -संतोष वीर

Admin

 "सकारात्मकतेने प्रयत्नशील राहा यश तुमचेच" - संतोष वीर 


    हरिपूर प्रतिनिधी - श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल हरिपूर या शाळेतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी- जिल्हा परिषद सांगली, सामान्य प्रशासन विभाग कनिष्ठ प्रशासनाधिकारी मा. संतोष वीर  हे होते . याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "मनापासून अभ्यास करा .सकारात्मक विचार नेहमी बाळगा आणि प्रयत्नशील रहा, यश तुमचेच असेल. भरपूर खेळा. नियमित व्यायाम करा .शरीर व मन निरोगी राहील. मी यशस्वी होणारच या विचारांने सदैव कृतिशील राहा. ज्ञानास्र धारदार ठेवा .आई-वडील व शिक्षकांचा नेहमी आदर करा.चांगले वागा. चांगले वाचा. चांगले ऐका .चांगला विचार करा. आपल्यातील नेतृत्वगुणांचा विकास निश्चितच होईल." असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार हे होते .


       स्वागत व प्रस्ताविक श्री. विठ्ठल मोहिते यांनी केले. याप्रसंगी एन.एम.एम. एस. व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या चि. वेदांत किरण कुबडगे कु.श्रेया सचिन माळी, कु.आर्या अतुल सूर्यवंशी कु. संस्कृती नंदकुमार जाधव यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट देऊन करण्यात आला. याप्रसंगी किरण कोबडगे, सचिन माळी, कविता पाटील, किरण पाटील आदी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन श्री. राजकुमार हेरले ,सुनील खोत, बबन शिंदे ,अजितकुमार कोळी, पूजा पाटील, हर्षदा काटकर यांनी केले. तर आभार ज्येष्ठ शिक्षिका संध्या गोंधळेकर यांनी मानले.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top