श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा

Admin

 श्रीमती कोंडाबाई  साळुंखे हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा 


    हरिपूर प्रतिनिधी- दि. २४  येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये २१ जून हा 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा झाला.


   मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून योग दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.  श्री.विठ्ठल मोहिते यांनी 'योगाविषयी  बोलताना म्हणाले की, 'योग ही सुदृढ निरामय जीवनाची गुरूकिल्ली आहे. योग-दिन हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न करता 'योग' नियमित केल्यास, निरामय दीर्घायुष्य लाभते. तसेच आनंदी व प्रसन्न मन राहते. मनाची एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती वाढते.यासाठी योग नियमित करावा. असे प्रतिपादन केले.


   क्रीडा शिक्षिका सौ.पूजा पाटील व राजकुमार हेरले यांनी विद्यार्थ्यांकडून उभी आसणे, बैठी  आसणे, झोपून करायची आसणे ,प्राणायाम आदी योगाची सुंदर प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये सर्व शिक्षक-सेवक ,विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

   याचे संयोजन ज्येष्ठ शिक्षक संध्या गोंधळेकर ,मनीषा वड्डदेसाई, हर्षदा काटकर, बबन शिंदे, सुनील खोत, अजितकुमार कोळी आदींनी केले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top