यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गलई उद्योजक संजय शेठ जाधव‌ यांच्यातर्फे वह्या वाटप :१६ वर्षांची अखंड परंपरा कायम

Admin

 यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना  गलई उद्योजक संजय शेठ जाधव यांच्यातर्फे  वह्या वाटप:  १६  वर्षाची अखंड परंपरा कायम 


विटा प्रतिनिधी -

   घोटी बुद्रुक गावचे सुपुत्र, गलाई  उद्योजक श्री. संजय शेठ जाधव यांनी भारती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या. गेली १६ वर्ष हा उपक्रम संजयशेठ मोठ्या दातृत्वातून करत आहेत. यंदाच्या वर्षी ही वह्या वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे.

   विद्यालयात दि. २७ जून रोजी वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 

  यावेळी बोलताना संजय शेठ म्हणाले की "मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आपली शाळा ही ग्रामीण भागातील शाळा आहे. आपल्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी होतकरू व गुणवंत आहेत. या आपल्या मुलांसाठी आपण सामाजिक जाणीवेतून वह्या वाटपाचा उपक्रम दरवर्षी करत असतो. आज या उपक्रमाला 16 वर्षे पूर्ण झाली. सलग सोळा वर्षे हा उपक्रम करत आहोत. यापुढे ही हा उपक्रम कायम करत शाळेसाठी आम्ही नक्कीच यथाशक्ती मदत करू. 

  या नंतर मा. सरपंच उद्धव जाधव यांनी संजय शेठ जाधव यांचे कौतुक करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. बी. कदम सर म्हणाले की, आपल्या विद्यालयाप्रति असलेली दातृत्वाची भावना व आपल्याला शाळेतील मुलांच्या भवितव्यासाठी गेली १६ वर्षे मोफत वह्या वाटपाचा असलेला उपक्रम अभिमानास्पद आहे. विद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी असा मदतीचा उपक्रम कायमच प्रेरणादायी आहे. संजय शेठ यांचे अफाट दा्तृत्व व शाळेप्रति असलेले प्रेम यातून व्यक्त होत आहे. 

  यावेळी गलाई उद्योजक संजय शेठ जाधव यांचा मुख्याध्यापक डी. बी. कदम सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास घोटी बुद्रुक च्या सरपंच सौ. सुवर्णाताई जाधव, मा. सरपंच उद्धव जाधव, गलाई उद्योजक संजय शेठ जाधव, जेष्ठ नागरिक मोहन अप्पा जाधव, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला जाधव, सुनिता जाधव, वर्षाताई सावंत, भरत कांबळे, सुरेश कदम तसेच ग्रामसेविका कविता पवार, शिवाजी पाटील, सुरेश जाधव, संतोष जाधव, विनोद जाधव, आशाराणी जाधव, मुख्याध्यापक डी. बी. कदम सर,   संजयकुमार कोळेकर , अनिल मगदूम , नितीन चंदनशिवे , शब्बीर पटेल, आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ,शिक्षक, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक बाजीराव प्रज्ञावंत यांनी केले तर आभार शालिवान लोखंडे यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top