भिलवडीच्या सेकंडरी स्कूल मध्ये जागतिक योग दिन साजरा
भिलवडी प्रतिनिधी- शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी मध्ये दहावा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगशिक्षक श्री. सुबोध वाळवेकर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगासनाचे विविध प्रकार करून दाखवले व त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी शिक्षक बंधू ही त्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सुबोध वाळवेकर म्हणाले की योग योगासनामुळे मन, बुद्धी ,शरीर प्रसन्न राहते शरीर निरोगी राहते. म्हणून भारतीय ऋषीमुनींनी योगाला महत्त्व दिले आहे .म्हणून आपण आपले शरीर निरोगी राहावे म्हणून नियमित योगासने केली पाहिजेत .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.