वैद्य गौरी बोरकर यांचे विद्यार्थ्यिनींना आहार , विहार , आरोग्य , व संस्कारक्षम जीवन शैली विषयक मार्गदर्शन

Admin

 वैद्य गौरी बोरकर यांचे  विद्यार्थ्यिनींना आहार , विहार , आरोग्य , व संस्कारक्षम जीवन शैली विषयक मार्गदर्शन

भिलवडी प्रतिनिधी - दि. ९ 

भिलवडी शिक्षण संस्थेच्या,सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज,भिलवडी मधील इ ५ वी ते इ ९ वी तील सर्व मुलींना दैनंदिन आहार ,विहार , शालेय आरोग्य व संस्कार ह्या विषयावर वैद्य गौरी बोरकर, ठाणे यांनी मार्गदर्शन केले. श्री . सदगुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठान , कोल्हापूर यांच्या मार्फत मुनिंद्र श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर दिंडी ही २५ वर्षे पायी वारी सेवा करत आहे . या दिंडीमध्ये महाराष्ट्रातून अनेक सेवाभावी वारकरी वैद्य, उद्योजक हे सहभागी होत असतात .या दिंडीचे वतीने मुलींनसाठी हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.


सुरूवातीला डॉ. सुमित साळुंखे यांनी दिंडीची माहिती, ट्रस्टच्या कामाची माहिती दिली . यांचे मार्फत वृक्षारोपण व आरोग्य शिबिर घेतली जातात असे सांगितले . यावेळी वैद्य अभिजीत जानकर व वैद्य किरण ढोक ,  माधवी हारणे उपस्थित होते . विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.संजय मोरे  , उपमुख्याध्यापक विजय तेली व पर्यवेक्षक विनोद सांवत  यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले . 



यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका  सौ. पौर्णिमा धेंडे , , सौ. गिता गावीत , सौ. वर्षा चौगुले  ,सौ . सुप्रिया यादव  , सौ.वैशाली पाटील , सौ . शैलजा पाटील  , सौ .विद्या नाईक  , सौ . अश्विनी मगदूम  उपस्थित होत्या.

 स्वागत व प्रास्ताविक जेष्ठ शिक्षिका सौ . रौनक तांबोळी यांनी केले. अश्विनी गुणाले यांनी सूत्रसंचलन केले. रिजवाना मुल्ला  यांनी आभार मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top