परमार्थ साधण्यासाठी संतांच्या विचारांची गरज'-प्रा.गणेश शिंदे

Admin

 'परमार्थ साधण्यासाठी संतांच्या विचारांची गरज'-प्रा.गणेश शिंदे


भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा,थोर समाजसेविका कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा २९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.यावेळी

गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही.आपल्या वाट्यास आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला शिका. काळ आणि वेळ कमालीचा बदलत आहे,परिस्थितीच भान ठेऊन बदलत्या काळानुसार बदलायला शिकाल तरच स्पर्धेच्या युगात टिकाल. तसेच जीवनात परमार्थ साधण्यासाठी संतांच्या विचारांची गरज आहे.असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा.गणेश शिंदे यांनी केले.



भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका स्व.डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित आयोजित' जीवन सुंदर आहे' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यापुढे बोलताना प्रा.गणेश शिंदे म्हणाले की,शिक्षकाच्या आयुष्याची पूंजी म्हणजे त्यांनी घडविलेले विद्यार्थी होय.म्हणूनच शिक्षक गुरूस्थानी असतात.





याप्रसंगी डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांसाठी 'मोगरा फुलला 'हा भक्तिमय संगीत कार्यक्रम सौ.संगिता शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर करून परिसरातील वातावरण भक्तिमय केले.

प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.सहसचिव के.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.महेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.तर यांनी आभार विजय तेली यांनी मानले.

यावेळी विश्वस्त गिरीश चितळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड,डॉ.सुहास जोशी,अशोक चौगुले,संचालक सौ.लीना चितळे,महावीर वठारे,डॉ. रविंद्र वाळवेकर,मुकुंद जोग,संभाजी सूर्यवंशी,अजय चौगुले,सदाशिव तावदर, चंद्रकांत पाटील,प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top