कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आरक्षण दिन साजरा.

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आरक्षण दिन साजरा.


सांगली प्रतिनिधी -

    कास्ट्राईब शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य जिल्हा सांगलीच्या वतीने २६ जुलै हा " राष्ट्रीय आरक्षण दिन "म्हणून साजरा करण्यात आला. २६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू केले. याचे औचित्य साधून  कास्ट्राईब शिक्षक संघटना  वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष मा. बाजीराव प्रज्ञावंत यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजेसाहेब लोंढे, उपशिक्षणाधिकारी  मा. विशाल दशवंत साहेब, अधीक्षक  मा. नारायण माळी साहेब, माध्यमिक वेतन अधीक्षिका  मा. किशोरी करमुसे मॅडम, सावंत मॅडम यांना राष्ट्रीय आरक्षण दिनाच्या  शुभेच्छा देण्यात आल्या. 






   या प्रसंगी संघटनेच्या राज्य प्रतिनिधी  सौ. विनोदिनी मिरजकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा  सौ. संगिता कांबळे, जिल्हा सचिव विद्याधर रास्ते, वाळवा तालुका प्रतिनिधी अनिल शेजाळे, सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्था संचालक मा.दिपक शेसवरे सर उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top