कोणतीही कला जीवनाला समृद्ध करते - कवी प्रदीप पाटील

Admin

कोणतीही कला जीवनाला समृद्ध करते."

                     - कवी प्रदीप पाटील 


हरिपूर दि.१३. 'विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील कलागुणांची जोपासना करण्याच्यादृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.कोणतीही कला जीवनाला समृद्ध करते,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांनी केले.

            शासनाच्या महावाचन अभियानांतर्गत श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल,हरीपूर येथे 'साहित्यिक आपल्या भेटीला' या उपक्रमात ते बोलताना म्हणाले,'आपल्याजवळ असलेले कलागुण ओळखल्याशिवाय स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण होत नाही. स्वतःला ओळखणे म्हणजेच शिकणे असे सांगून त्यांनी अनेक विषयांची उदाहरणे दिली.

    यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव  पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल मोहिते यांचा सत्कार -ज्ञानपीठकार लेखक एस.एल.भैराप्पा यांची 'उत्तरकांड' ही साहित्यकृती ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

   प्रास्ताविक राजकुमार हेरले यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार यांनी साहित्यिक प्रा.प्रदीप पाटील यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार केला.

आभार सुनिल खोत यांनी मानले.

याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक संध्या गोंधळेकर, पूजा पाटील, हर्षदा काटकर, बबन शिंदे, अजितकुमार कोळी, शिक्षक-सेवक विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top