भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कृ.श्री. म्हस्कर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Admin

 भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कृ.श्री. म्हस्कर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी मध्ये भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृ. श्री. म्हस्कर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. 


   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ता व विज्ञान बोध वाहिनी राज्य कार्यवाह मा. भास्कर सदाकळे हे होते. सर्वप्रथम डॉ.कृ.श्री.  म्हस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर समाजातील चमत्कार, बुवा बाजी, भानामती, करणी, जादूटोणा या गोष्टीतून फसवणूक कशी केली जाते याबाबत वेगवेगळ्या प्रयोगातून श्री.भास्कर सदाकळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काही प्रसंग त्यांनी सादर केले, प्रयोग सादर केले.याचबरोबर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना सारासार विचार करणे गरजेचे असते व त्या घटनेमागील विज्ञान जाणून घेणे आवश्यक असते असे विचार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मांडले.यावेळी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख टी. एस पाटील यांनी केले. पाहुणे परिचय निलेश कुडाळकर यांनी करून दिला. तर डॉ. कृ .श्री. म्हस्कर यांचा कार्य परिचय पी .बी पाटील यांनी करून दिला .


   या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, पर्यवेक्षक विनोद सावंत , संस्थेचे सहसचिव के.डी पाटील ,ज्येष्ठ शिक्षिका रौनक तांबोळी , सर्व विज्ञान शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर सेवक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल भोये यांनी केले तर आभार रोहित महेंद्रकर यांनी मांनले.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top