मा.आकाश तांबे व मा.रविंद्र पालवे यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय कार्यकारी मंडळावर अशासकीय सदस्य पदी निवड

Admin

मा.आकाश तांबे व  मा.रविंद्र पालवे यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय कार्यकारी मंडळावर अशासकीय सदस्य पदी निवड


 सांगली प्रतिनिधी : - कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यकारी मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्याध्यक्ष आकाश तांबे यांची निवड करण्यात आली आहे.तर मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यकारी मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे यांची निवड करण्यात आली आहे.

 त्यांच्या या निवडीबद्दल  विविध स्तरातून स्वागत, अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या योग्य निवडीने शिक्षक बांधवातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सांगली जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे वतीने या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला,अभिनंदन करण्यात आले.

या निवडीबद्दल आकाश तांबे म्हणाले की, आमची निवड ही प्रातिनिधिक स्वरूपात आहे. या सर्वाचे श्रेय माझे राज्यातील कास्ट्राईब शिक्षक संघटनेतील सर्व सदस्य व पदाधिकारी या सर्वांना जाते. शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने माझी व सरचिटणीस रविंद्र पालवे यांची निवड केली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.अशी माहिती संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी दिली.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top