राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आचारसंहितेमुळे तुर्तास स्थगित:अर्ज दाखल करणेही केले बंद.

Admin

 राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी  बहिण योजना आचारसंहितेमुळे तुर्तास स्थगित:अर्ज दाखल करणेही केले बंद.


सांगली प्रतिनिधी -राज्य विधानसभेच्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरकारने शनिवारी स्थगिती दिली आहे.

आचारसंहिता संपुष्टात येताच ही योजना पूर्ववत सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे.

सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत. राज्य सरकारने नोव्हेंबरचा हप्ताही चालू महिन्यातच जमा केला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांना मिळावा, यासाठी सरकारने अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. आता ही तारीख उलटून गेली आहे.

महिलांना आता योजनेत अर्ज करता येणार नाहीत. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकणे थांबवले आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाहीत. राज्य सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दर महिन्याला १० हजार रुपयांच्या मानधनावर योजनादूतांची नियुक्ती केली होती. आता या योजनेलाही माहिती व प्रसारण विभागाने स्थगिती दिली आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top