इस्रो'च्या प्रक्षेपकाची प्रतिकृती अनुभवण्याची आज मिळणार संधी, स्पेस ऑन व्हील्स आज भिलवडीच्या सेकंडरी स्कूल मध्ये येणार.

Admin

 'इस्रो'च्या प्रक्षेपकाची प्रतिकृती अनुभवण्याची आज मिळणार संधी, स्पेस ऑन व्हील्स आज भिलवडीच्या सेकंडरी स्कूल मध्ये येणार.



भिलवडी प्रतिनिधी : 'इस्रो'च्या प्रक्षेपकाची प्रतिकृती अनुभवण्याची भिलवडीकरांना संधी मिळणार आहे. आज (ता. १०) भिलवडी शिक्षण संस्थेच्या, सेकंडरी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विज्ञान भारती यांच्यातर्फे 'स्पेस ऑन व्हील्स' बस येणार आहे. याद्वारे विविध उपग्रह प्रक्षेपणाच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच भारताच्या चांद्रयान, मंगलयान मोहिमांविषयी माहिती देण्यात येणार आहे. 






भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.अनघा चितळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.परिसरातील शाळांना बस मधील विविध प्रक्षेपक, यान, उपग्रह यांचे प्रदर्शने पाहण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुली ठेवण्यात येईल, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मा.संजय मोरे   यांनी दिली. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे, सर्व संचालक  ,सदस्य उपस्थित राहणार आहेत.

परिसरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी , शिक्षक, विद्यार्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top