कास्ट्राईब शिक्षक संघटना व बौद्ध मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी .
सांगली प्रतिनिधी :
बौद्ध मायनाॅरिटी एज्युकेशन सोसायटी व कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा सांगली च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला जिल्हा कार्यकारणी सदस्या अनिता प्रज्ञावंत, महिला आघाडी प्रमुख संगीता कांबळे, मंगल कांबळे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर 'महापुरुषांचे विचार एक आपल्याला प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा सतत तेवत राहावी यासाठी जयंती साजरी करण्यात येते .महापुरुषांनी कार्य करत असताना जाती पाती पलीकडील विचार केला .मानव जातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. त्यामुळे महापुरुषांना जातीपातीच्या बंधनात विभागणे गैर ' असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी केले. यावेळी बौद्ध मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मानव प्रज्ञावंत यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे ,सचिव विद्याधर रास्ते, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे ,कार्याध्यक्ष सुरेश कोळी ,उपाध्यक्ष उत्तम मंगल ,मुख्य संघटक अशोक हेळवी, सतीश कांबळे आधी मान्यवर उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.